-->

संजय देरकरांच्या नेतृत्वात जेष्ठ शिवसैनिकांनी धरली कास!

0

संजय देरकरांच्या नेतृत्वात जेष्ठ शिवसैनिकांनी धरली कास!

.

वणी:- यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी ४ ऑगस्ट ते ११ दरम्यान पक्षाच्या आदेशाने भगवा सप्ताह आयोजित केला होता. प्रसंगी ६ ऑगस्ट ला वणी येथील वरोरा रोडवर असलेल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. दरम्यान गटा तटाच्याLHYT राजकारणापासून दूर गेलेल्या जेष्ठ निष्ठावंत शिवसैनिकांचा सत्कार घेण्यात आला. प्रसंगी जेष्ठ शिवसैनिकांनी शिवसेनेला वणी विधानसभेत मनासारखे नेतृत्व लाभल्याने जेष्ठ शिवसैनकानी संजय देरकरांची कास धरत येत्या विधानसभाBG निवडणुकीत संजय देरकरांना साथ देणार असे उद्गार काढले.

जेष्ठ शिवसैनिकांचा शिवसेना जनसंपर्क कार्यालयात सत्कार!


जेष्ठ शिवसैनिकांचा शिवसेना जनसंपर्क कार्यालयात सत्कार!

     यवतमाळ जिल्ह्यातील ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आपापल्या परीने दावे सांगत आहे. परिणामी दोन्ही पक्षाचे नेते गावागावात रणधुमाळी करतांना दिसते आहे. 

     यातच मागील काळात वणी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय देरकर यांनी मागील अनेकदा निवडणुका लढविल्या यात त्यांना अपयश जरी आले YHXय6असले तरी, त्यांनी अपक्ष निवडणुका लढवीत जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मनमिळावू नेतृत्व असल्याने गटा तटाच्या राजकारणात गप बसलेले निष्ठावंत शिवसैनिकांना नवी उमीद मिळाली. हाच धागा पकडून आणि गाव तिथे शाखा,घर तिथं शिवसैनिक हे धोरण राबवित "माझी विद्युत माझा अधिकार," हे अभियान राबवून शिवसेनेला  उजाळा देत, ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार "भगव्या सप्ताहाचे "आयोजन करीत ६ ऑगस्ट ला वरोरा रोडवरील जनसंपर्क कार्यालयात जेष्ठ शिवसैनिकांच्या सत्काराचे आयोजन केले होते.

    यावेळी जेष्ठ शिवसैनिकांनी आपल्या मनातील धग बोलून दाखविल्या, प्रसंगी येत्या निवडणुकीत संजय देरकर यांना तन, मन,धनाने सहकार्य करून हेच आपले जिव्हाळ्याचे नेते आहेत असे बोलत देरकरांची कास धरली.

प्रसंगी प्रकाश कऱ्हाड, निकेश चव्हाण,वसंतराव डुकरे, चंदू हस्तक, रमेश शर्मा,विलास भट, दिवाकर वनकर,खुशाल शेंडे,मंगेश मत्ते, विलास वांढरे, विनोद बलकी, राजू मोहितकर,रामकृष्ण राजूरकर,अजय चन्ने, दीपक कोकास,श्रीरंग दुरतकर, खंडू वरारकर, शामराव मडावी दिलीप खंडाळकर, महादेव बावणे, सुभाष भोगेकर , दिनेश भोHसकर, बंडू भाऊ बोथले, नितीन शिरभाते, विठ्ठल पाटील घाटे,,मारोती नगराळे,गोवर्धन प. टोंगे, सुनील ढुमणे,रामचंद्र वाभिटकर, खंडूभाऊ वरारकर, संकेत मोहिते, अर्जुन निखाडे, सुरेश देशकर, चंदाताई मुन,किर्तीताई देशकर, प्रमोद मुन,सुमंता उपरे, डिमनताई टोंगे,अनिल राजगडकर,गजानन आसुटकार, मंगेश करंडे,हरिदास केळझरकर आदी जेष्ठ शिवसैनिकांनी आपल्या ज्वलंत भावनाव्यक्त केल्यात. प्रसंगी सतीश वर्हाटे यांचा वाढदिवस संजय देरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला होता.सूत्र संचालन प्रशांत बलकी, यांनी केले प्रसंगी संजय देठे,मो असलम, संतोष भोंगळे,विनोद ढुमणे,संतोष कुचनकर,यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.  




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top